नाशिक शहरातील सततच्या चैनस्नॅचिंग घटनांवर लगाम घालत, नाशिक गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ ने मोठी कामगिरी बजावली आहे. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखेने अट्टल सराईत गुन्हेगार योगेश गायकवाड आणि किरण छगन सोनवणे यांना जेरबंद केले असून, त्यांच्या विरोधात एकूण २२ गुन्हे उघड करण्यात आले आहेत.

गुन्हेशाखेच्या पथकाने सिन्नरफाटा परिसरात सापळा रचून संशयित आरोपी योगेश गायकवाड याला अटक केली. त्यानंतर त्याच्या साथीदार किरण सोनवणे यालाही मध्यवर्ती कारागृह, नाशिकरोड येथून ताब्यात घेतले. आरोपींनी चैनस्नॅचिंगचे २० गुन्हे, मोटारसायकल चोरीचा १ गुन्हा आणि घरफोडीचा १ गुन्हा केल्याची कबुली दिली. या कारवाईत एकूण ₹१८,११,८०० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव आणि सहा. पोलीस आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वात हे ऑपरेशन यशस्वी झाले. पोउनि चेतन श्रीवंत आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली.

रिपोर्टर फ़िरोज़ पठान की खबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *